ए.टी.एम.सेंटर मधुन चोरीस गेलेले ६६ लाख जप्त

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ची कामगिरी

दि.२४/०९/२०२० रोजी सकाळी ०७:०० वा. ते ०८:०० वा. चे दरम्यान माऊलीनगर व बडमुखवाडी, दिघी पुणे येथील दोन एस.बी.आय. बँकेचे ए.टी.एम. सेंटर मधुन कोणीतरी

अज्ञात आरोपींनी बनावट चावीचे सहाय्याने चार ए.टी.एम.मशीन उघडुन सदर ए.टी.एम. मशीन मधील रोख रक्कम व सी.पी.यु. व एस. अॅन्ड जी कंपनीचे लॉक चोरीस गेल्याने दिघी

पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३५८/२०२०,भा.द.वि.कलम ३८०,४२७ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

मा.पोलीस आयुक्त सो. व मा. पोलीस उप आयुक्त सोा. (गुन्हे), मा.सहा.पोलीस आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर गुन्हे

शाखा, युनिट ३, यांचे कडील अधिकारी व कर्मचारी यांच्या दोन टिम तयार केल्या त्यांनी

घटनास्थळ व आरोपींचा माग काढुन तांत्रीक तपास करुन तपासाची दिशा निश्चित केली व

त्याप्रमाणे तपास करीत असताना बातमीदारा मार्फत सपोनि सतिश कांबळे यांना मिळालेल्या

माहीती वरुन पिंपरी पुणे येथुन सापळा लावून ०२ संशयीत इसमांना मोटार सायकल नंबर

एमएच १९ बीटी २४९९ सह ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी

गुन्हयाची कबुली दिली व त्यांनी त्यांची नावे १) मनोज उत्तम सुर्यवंशी, वय ३० वर्षे, रा.

फलॅटनं. २०४, सत्यम इमारत, महाराष्ट्र स्कुलजवळ पिंपरी वाघीरे, पिंपरी, पुणे २) किरण

भानुदास कोलते, वय ३५ वर्षे, रा. ऐश्वर्यम हमारा, डी विंग फलॅटनं. १२१७, चिखली पुणे दोघे

मुळ राहणार जळगाव अशी सांगीतली असून त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे गुन्हयातील रोख

रक्कम ६६,१०,१००/- रुपये(सहासष्ठ लाख दहा हजार शंभर रुपये) व गुन्हयात वापरलेली

मोटर सायकल ६०,०००/- रुपये किंमतीची व इतर एटीएम मशिनचे साहीत्य असे जप्त केले असून गुन्हयाचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट ३ हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments